29 May 2020

News Flash

करोनाच्या धास्तीने आत्महत्या, पंचगंगा नदीत उडी घेत संपवलं आयुष्य

देशातील करोना बाधितांमध्ये वाढ

प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांमध्ये या अनोख्या व्हायरसची प्रचंड भीती पसरली असून कोल्हापुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

करोना व्हायरसच्या धास्तीनं कोल्हापुरातील एका वृद्ध महिलेने आत्महत्या केली आहे. मालुताई आवळे असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. कोल्हापूरजवळील शिये येथे ही दुर्देवी घटना घडली. शिये येथे असलेल्या पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेत वृद्ध महिलेने आपला जीवनप्रवास संपवला. गुरुवारी त्या वृद्ध महिलेचा मृतदेह नदीपात्रात सापडला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली असल्याची माहिती वृद्ध महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे देशात २१ दिवसांसाठी मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. सकंटाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांसाठी सर्वोत्परीने प्रयत्न करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच यासंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेय. तरीहीकरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 3:58 pm

Web Title: coronavirus fear old women commits suicide in kolhapur nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापुरात आर्थिक मदतीचा ओघ
2 ‘मास्क’निर्मितीत अनंत अडचणी
3 कोल्हापुरात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ासाठी नियोजन
Just Now!
X